यशवंत सामाजिक प्रतिष्ठान मध्ये आपले स्वागत आहे

तरुणाई समाजासाठी भारतीय नवतरुण हाच या देशाचा कणा आहे असे स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत याच उद्देशाने यशवंत सामाजिक प्रतिष्ठान नाव तरुणांचा समूह घेऊन समाजामध्ये समाजउपयोगी कार्य करण्यात सहभागी झाला असून विवीध सामाजिक उपक्रमातील सहभागामुळे समाजाच्या ऋणातून काही अंशी उतराह होण्याचा प्रयत्न करत आहे.

आपणा सर्वांचे या उपक्रमामध्ये स्वागत व आपलाही सहभाग असावा अशी अपेक्षा.

पाच दशकांपासून विविध क्षेत्रामध्ये कार्य करत असताना एक शिक्षक म्हणून कार्याची सुरुवात केली व आयुष्याकडे मागे वळून पाहत असताना या विधात्याने मला जन्मास का घातले? मी कोण? माझा जन्म कशासाठी? कोणत्या उदात्त हेतूसाठी परमेश्वराने मला जन्मास घातले या सर्व विचारांची घालमेल चालू असतानाच राजकारण, समाजकारण यांची सरमिसळ न करता मिळेल. त्या संधीचं सोनं करण्याचं कार्य माझ्या हातून घडविण्यासाठी खरं तर त्या विधात्याचे मी आभार मानतो. म्हणूनच सर्व तरुणांनी एकत्रित येऊन माझ्या वाढदिवसाचा घातलेला घाट एक एक अविस्मरणीय संकल्प व्हावा या हेतूने प्रशांत व त्याच्या सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी 'मरावे परी नेत्ररूपी उरावे' या संकल्पनेनुसार १२ मे २०१०... अधिक वाचा

कौटुंबिक राजकीय वारसा असतानाही आपण राजकारणाकडे पूर्णतः न झुकता समाजासाठी काही तरी करण्याची उर्मी मला काही शांत बसू देत नव्हती व इतर नेत्यांची, पुढार्यांची मुला वेग-वेगळ्या क्षेत्रात राजकीय काम करत असताना मी मात्र हे समाजकारणाचे क्षेत्र निवडले व त्यावेळची माझी निवड किती सार्थ होती याचा मला आनंद वाटतो. प्रतिष्ठानची स्थापना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करून वंचित घटकांसाठी कार्य करण्याचा वसा आम्ही कार्यकर्त्यांनी घेतला व त्याचे आज वटवृक्षात रुपांतर होताना,पाहताना, अंगावर मुठभर मांस चढवण्याचा आनंद मिळतो. अंधांसाठी काय करता येईल. या विचारांनी या साहेबांच्या वाढदिवशी आम्ही नेत्रदान संकल्प दिन म्हणून साजरा केला व गेल्या वर्षात...अधिक वाचा

आमचे उद्दिष्ट

28,000

जणांनी नेत्रदान संकल्पपत्र भरून दिले.

228

जणांनी नेत्रदान केले.

456

जणांना दृष्ठी प्राप्त झाली.

प्रतिक्रिया

आमचे उपक्रम